LIVE UPDATES

वैश्य समाज हॉलचे अनधिकृत रजिस्टर ॲग्रीमेंट

रमेश बोंद्रेवर गुन्हा दाखल करा ; युवा वैश्यवाणी संघटनेची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 05, 2026 13:57 PM
views 126  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : वैश्य समाजाच्या हॉलचे अनधिकृत रजिस्टर ॲग्रीमेंट करून फसवणूक केल्याचा आरोप करत रमेश बोंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी युवा वैश्यवाणी संघटनेचे अध्यक्ष अमित गवंडळकर यांनी पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. यावेळी वैश्य समाज बांधव उपस्थित होते.

वैश्य समाज संस्थेच्या हॉलचे अनधिकृतपणे रजिस्टर ॲग्रीमेंट करून संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी रमेश बोंद्रे यांच्या विरोधात तात्काळ एफआयआर दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार सावंतवाडी पोलीसांत दाखल करण्यात आली आहे.  मायकल ग्रॅव्हिल डिसोझा (रा. कोलगाव, सावंतवाडी) यांच्यासोबत हॉलचे रजिस्टर ॲग्रीमेंट केल्याचे या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. संस्थेचा अधिकृत ठराव, धर्मादाय आयुक्त किंवा कार्यकारिणीची कोणतीही संमती घेतलेली नसून आर्थिक फायद्यासाठी संस्थेचे नाव व शिक्क्याचा वापर करून बनावट व बेकायदेशीर दस्तऐवज तयार केले असून वैश्य समाजाची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी युवा वैश्यवाणी संघटनेचे अध्यक्ष अमित गवंडळकर, ॲड. पुष्पलता कोरगावकर, शुभांगी सुकी, तनुजा पोकळे, श्रेयस मुंज, नित्यानंद कोरगावकर, शैलेश गवंडळकर, संतोष मुंज आदींसह समाज बांधव उपस्थित होते.