
वेंगुर्ला : राज्यस्तरीय कृषी विभाग मान्यताप्राप्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय वेंगुर्ला मार्फत घेण्यात आलेल्या वेंगुर्ला तालुकास्तरीय भात पीक स्पर्धा २०२५ - २६ मध्ये शेतकरी उदय राजाराम परब ( मातोंड) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर जयसिंग बळीराम देसाई (वजराट) द्वितीय व मधुकर त्रिंबक परब ( मातोंड) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. यांचा केळूस येथे कृषिदीन कार्यक्रमामध्ये सभापती शंकर घारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, सुपारीचे रोप, गोकृपामृत, पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच या कार्यक्रमात सरपंच व सर्व सदस्य, मृदा परीक्षणबद्दल मदत रघुनाथ सावंत (खानोली), शेतकरी, बचतगट प्रतिनिधी, ग्रामसंघ अध्यक्ष, श्री शेतकरी गट केळूस कालवी, पाणी फाउंडेशनचे श्री पाटील, श्री सोनटक्के, शेतकरी गट कालवी, तसेच स. का. पाटील केळुस विद्यालय मुख्याध्यापक श्री. खोत व शिक्षकवृंद, राष्ट्रीय हरित सेनेचे पदाधिकारी, तारादेवी महिला गट यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात तारादेवी महिला गटाने शेतकरी नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी स.का. पाटील विद्यामंदिर केळुस, नवभारत विद्यालय केळुस व जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कालवी आदी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण, वृक्षदिंडी, विविध रानभाज्या प्रदर्शन व विक्री, पारंपरिक कृषी अवजारे प्रदर्शन यामध्ये सहभाग घेतला.
वेंगुर्ला तालुकास्तरीय कृषीदिन व शेतकरी मेळावा केळूस येथे संपन्न झाला, यावेळी हे सत्कार करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई, जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर, संजय गावडे, सुजाता पडवळ, विजय नाईक, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, पं.स. कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, पंचायत समिती सदस्य विष्णु फणसेकर, नितीन मांजरेकर, शीतल राऊत, साक्षी नार्वेकर, केळूस सरपंच योगेश शेटये, उपसरपंच संजीव प्रभू, ग्रामपंचायत अधिकारी विवेक वजराटकर, ग्रामपंचायत सदस्य सुषम मसुरकर, महेश नागवेकर, सुभाष साटम, लक्ष्मण वराडकर, दीप्ती मुननकर, मानसी कुडव, अक्षया केळुसकर, रुचिरा प्रभु केळुसकर,स. का. पाटील विद्यामंदिर केळूस चे मुख्याध्यापक पी. एस. खोत, मोबारकर, अंकुश मुननकर, वामन मडकईकर तसेच ग्रामस्थ, शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.











