LIVE UPDATES

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री दिर्बा देवी-रामेश्वर देवस्थानची २४ नोव्हेंबरला यात्रा

भाविकांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी प्रथमच मंडपाची व्यवस्था ; दर्शनासाठी स्वतंत्र रांग
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 19, 2026 07:56 PM
views 49  views

देवगड : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त देवगड जामसंडेची ग्रामदेवता श्री दिर्बादेवी- रामेश्वर देवस्थानची वार्षिक यात्रा २४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेसाठी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून, भाविकांच्या सोयीसाठी मंडप, दर्शनासाठी रांग, पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती देवस्थानच्यावतीने विद्यमान पाळीदार दीपक घाडी यांनी जामसंडे येथील श्री दिर्बादेवी मंदिर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी विश्वनाथ उर्फ बंडू घाडी, प्रसाद घाडी आदी उपस्थित होते. दीपक घाडी म्हणाले, यंदा प्रथमच यात्रेच्या व्यवस्थेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उन्हात उभे राहावे लागू नये, यासाठी मंदिराच्या मागील बाजूस रांगेची व्यवस्था करून त्यावर मंडप उभारण्यात आला आहे. तसेच मंडपाची आणि समोरील विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. रांगेचे नियोजन करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

देवगड नगरपंचायत तसेच पोलीस प्रशासनाचेही चांगले सहकार्य लाभत आहे. वाहनांच्या पार्किंगची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या जामसंडे येथे मुख्य रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून यात्रा स्थळी पार्किंगची व्यवस्था व वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी संबंधित रस्त्याच्या कामाच्या ठेकेदाराशी चर्चा करण्यात आली आहे.

दिर्बादेवी मंदिर तिठा येथून वाहनांना प्रवेश देऊन आयटीआयच्या गेटमधून बाहेर सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आयटीआय प्रशासनाला पत्र देण्यात आले असून, पार्किंगसाठी आयटीआयचे कंपाउंड भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहे. या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांनी या वाहतूक व्यवस्थेची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री. घाडी यांनी केले आहे. 

यात्रेच्या दिवशी पहाटे ४ वाजता श्री दिर्बादेवी व रामेश्वर देवतांची पूजा-अर्चा आणि वस्त्रालंकार विधी होणार आहेत. त्यानंतर सकाळी ६ वाजल्यापासून ओटी भरणे आणि दर्शनाला सुरुवात होईल. सकाळी १० वाजल्यानंतर स्थानिक तसेच बाहेरून येणाऱ्या भजन मंडळांचे कार्यक्रम होतील. रात्री रामेश्वर मंदिरात व्यासपूजा, कीर्तन, त्यानंतर पालखी उत्सव आणि लोटांगणाची पारंपरिक प्रथा पार पडणार आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमांनंतर यात्रेची सांगता होईल.

दरम्यान, मंदिराचे रंगकाम तसेच नवीन लाद्या बसविण्याचे काम करण्यात आले असून, यासाठी आर्थिक व अन्य स्वरूपात सहकार्य करणाऱ्या दात्यांचे देवस्थान ट्रस्टतर्फे आभार मानण्यात आले. यात्रेला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून त्यांचा यथोचित सत्कारही करण्यात येणार आहे, असेही श्री. घाडी यांनी सांगितले.


ताजी बातमी

View all

Cyber fraud incident involving a merchant who allegedly lost Rs 92000 through PhonePe UPI in Achara Sindhudurg
Cyber Fraud : फोनपे यूपीआयच्या माध्यमातून व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक
November 19, 2026
Nitesh Rane reviews Sindhudurg drought management plan and water scarcity measures at district collector office
Sindhudurg Drought Management Plan : टंचाई आराखड्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करा
November 19, 2026
Nitesh Rane reviews new Marine Engine Fitter and Marine Fitter courses in Sindhudurg ITIs
Marine Courses in Sindhudurg ITI : जहाज बांधणी, बंदर विकासासाठी सिंधुदुर्गात कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करणार
November 19, 2026
Nitesh Rane hands over appointment letter to Shailesh Newalkar under compassionate appointment scheme in Sindhudurg
अनुकंपा तत्त्वावरील पात्र उमेदवारास पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
November 19, 2026
संबंधित बातम्या

View all

Nitesh Rane reviews Sindhudurg drought management plan and water scarcity measures at district collector office
Sindhudurg Drought Management Plan : टंचाई आराखड्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करा
November 19, 2026
Nitesh Rane reviews new Marine Engine Fitter and Marine Fitter courses in Sindhudurg ITIs
Marine Courses in Sindhudurg ITI : जहाज बांधणी, बंदर विकासासाठी सिंधुदुर्गात कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करणार
November 19, 2026
Nitesh Rane hands over appointment letter to Shailesh Newalkar under compassionate appointment scheme in Sindhudurg
अनुकंपा तत्त्वावरील पात्र उमेदवारास पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
November 19, 2026
आकारीपड जमीन प्रश्नावर उद्या गोठोस तिठा येथे महत्त्वपूर्ण मेळावा
November 19, 2026