LIVE UPDATES

देवगड बंदरातील एकदंत नौकेवरील ५८ वर्षीय खलाशी बेपत्ता

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 22, 2026 21:03 PM
views 27  views

देवगड : येथील बंदरातील ‘एकदंत’ या नौकेवरील खलाशी वासुदेव गणपत कांबळे (वय 58, सध्या रा. देवगड बंदर, मुळ रा. डोर्ले, गावखडी, रत्नागिरी) शनिवारी पहाटेपासून बेपत्ता आहेत. ही घटना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. याबाबत येथील पोलीस ठाण्यात दशरथ अशोक बोराटे (वय 38, सध्या रा. देवगड बंदर, मुळ रा. गावखडी, रत्नागिरी) यांनी खबर दिल्यानुसार नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ बोराटे यांच्यासोबत कैलास खांदारे यांच्या ‘एकदंत’ या बोटीवर खलाशी म्हणून काम करणारे वासुदेव कांबळे असे सर्वजण शुक्रवारी रात्री नौकेवर झोपले होते. यातील कांबळे हे पहाटेच्या सुमारास नौकेवर दिसले नाहीत. कोणालाही काहीही न सांगता निघून गेले ते अद्यापपर्यंत परत न आल्याने येथील पोलीसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. वासुदेव कांबळे हे गेली अनेक वर्षे बोटीवर कामास होते. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोज राऊत करीत आहेत.