LIVE UPDATES

इळये आरोग्य केंद्रात जलसुरक्षकांना पाणी गुणवत्तेबाबत प्रशिक्षण

शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठ्यासाठी जलसुरक्षकांना मार्गदर्शन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 10, 2026 18:45 PM
views 43  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : इळये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील जलसुरक्षकांसाठी पाणी गुणवत्ता व सुरक्षित पिण्याच्या पाण्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र इळये येथे उत्साहात संपन्न झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणास आरोग्य सहाय्यक सखाराम गुरखे, उपविभागीय समन्वयक पाणी गुणवत्ता हर्षदा बोथीकर, समूह समन्वयक विनायक धुरी आदी उपस्थित होते.

  या प्रशिक्षणामध्ये गावातील नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलसुरक्षकांची भूमिका, पाण्याची गुणवत्ता तपासणी, पाणी दूषित होण्याची कारणे तसेच पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्याची पद्धत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

 पिण्याच्या पाण्याचे नियमित शुद्धीकरण करून पाणी गुणवत्तेबाबत दक्षता घेणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. तसेच स्वच्छता सर्वेक्षण, पाणी नमुना तपासणी आणि WQMIS प्रणालीमध्ये पाणी नमुन्यांची नोंद (एन्ट्री) याबाबतही जलसुरक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता अधिक असल्याने पाणी गुणवत्तेची नियमित शुद्धीकरण करणे गरजेचे आहे.

 या प्रशिक्षणामुळे जलसुरक्षकांना पाणी गुणवत्ता तपासणीसंदर्भात आवश्यक तांत्रिक माहिती मिळाली असून, गावातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या कार्याला अधिक बळ मिळणार आहे