
सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून 'सेवा अभियान' सावंतवाडी विधानसभेत राबवले जात आहे. उद्या सोमवार दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी याचे आयोजन काझी शहाबुद्दीन हॉल सावंतवाडी येथे करण्यात आले असून आपल्या भागातील समस्यांबाबतचे निवेदन प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण यांच्या नावे तयार करून आणावे असे आवाहन सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले आहे.
ॲड. निरवडेकर म्हणाले, 'सेवा अभियान' सावंतवाडी येथे संयोजक विधानपरिषद आमदार प्रमोदजी जठार, रवींद्र चव्हाण यांचे ओएसडी श्री. साखरे उपस्थित राहणार असून निवेदन स्वीकारणार आहेत. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडीमधील सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष या सर्वांच्या प्रयत्नातून उद्या काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये सकाळी १० वाजता यांचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या ज्ञा
'सेवा अभियान'मध्ये आपल्या भागातील वेगवेगळ्या योजना, अडचणी, समस्यांचे निवेदन प्रत्येक बूथ अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख, मंडळ अध्यक्ष, नगरसेवक, नगराध्यक्ष व पदाधिकारी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नावावरती निवेदन तयार करून आणायचे आहे. हे निवेदन काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये या ठिकाणी द्यायचे आहे. या अभियानाअंत येणाऱ्या निवेदनावर प्रदेश कार्यालयावरती सारासार विचार होऊन आपल्या प्रभागात, आपल्या वॉर्डमध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये जो निधी उपलब्ध व्हायला पाहिजे किंवा जी समस्या आहे, जी विकासकामे आहेत, त्याबाबत या अभियानामध्ये परिपूर्ण समस्येचे निराकरण करून या पूर्ण अभियानाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष त्यामध्ये मार्ग काढणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.
या अभियानामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचासुद्धा पूर्णपणे सहभाग आहे. तर भाजप युवा नेते विशाल परब, जि.प. सदस्य संदीप गावडे, उपसभापती गौरव मुळीक, नेमळे माजी सरपंच विनोद राऊळ, युवा मोर्चाचे हितेन नाईक, विनेश तावडे ही सर्व मंडळी तन-मन-धन अर्पण करून उद्याचा हे अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपापल्या समस्या लिखित स्वरूपात, निवेदनाच्या स्वरूपात सकाळी १० वाजता काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे घेऊन याव्यात असे आवाहन उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांनी केले.










