LIVE UPDATES

साळशी हायस्कुलच्या शाळाव्यवस्थान समिती अध्यक्षपदी सत्यवान भोगले

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 23, 2026 20:25 PM
views 33  views

देवगड : देवगड तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर साळशी  हायस्कूलचे स्कूल कमिटी चेअरमन तथा चाफेड गावचे माजी सरपंच सत्यवान सूर्यकांत भोगले यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

शासन निर्णयानुसार या समितीमध्ये 50 टक्के महिलांना संधी देण्यात आली.  यावेळी संस्था अध्यक्ष सत्यवान सावंत,  प्रभारी मुख्याध्यापक संजय मराठे,  शिक्षक  पुरुषोत्तम साटम, स्वप्नील भरणकर, शिपाई भिसे तसेच देवणेवाडी -  सरमळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक समाधान कोळी, अंगणवाडी सेविका सौ. प्रतीक्षा शिवलकर, मदतनीस श्रीमती संध्या नाईक तसेच सर्व पालक विद्यार्थी उपस्थित होते.