LIVE UPDATES

...अखेर ते खड्डे बुजविले

स्वीकृत नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरेंची तत्परता
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 26, 2026 12:15 PM
views 45  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे. कोकणसादने याबाबतचे वृत्त केले होते. त्याची दखल घेत स्वीकृत नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी तात्काळ नगरपरिषद अधिकाऱ्यांना सुचना देत खड्डे बुजविण्यास सांगितले. 

त्यानुसार आज सकाळीच हे खड्डे बुजविण्यात आले. या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. रहदारीचा रस्ता असल्याने हानी होण्याची शक्यता होती. यापुर्वीही तिथे अपघात घडले होते. त्यानंतर बुजविण्यात आलेले खड्डे महिनाभर देखील टिकले नाहीत. या खड्डयांपासून नगरपरिषद १०० मीटर वर आहे. मात्र, स्वीकृत नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरेंनी तत्परता दाखवल्यानंतर ते खड्डे तात्काळ बुजविण्यात आले. यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.