LIVE UPDATES

सातार्डा येथील दिंडी सोहळ्यात लोकप्रतिनिधीही सहभागी

आषाढी एकादशीनिमित्त आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 26, 2026 12:04 PM
views 41  views

सावंतवाडी : आषाढी एकादशीनिमित्त सातार्डा येथे काढण्यात आलेल्या टाळ नृत्य, दिंडी सोहळ्याला विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लक्षवेधी दिंडी सोहळ्यामध्ये आरोंदा मतदार संघाचे जि प सदस्य सुदन कवठणकर , पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये यांनी पालखी मिरवणुकीमध्ये सहभाग घेत आनंद घेतला.

 यावेळी पं स सदस्य उदय पारिपत्ये, सरपंच संदीप प्रभू, कवठणी सरपंच अजित कवठणकर, सातार्डा ग्रामपंचायत सदस्य वासुदेव राऊळ,शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष गोवेकर, सावंतवाडी महिला उपतालुका प्रमुख सृष्टी वेंगुर्लेकर, शाळा समिती अध्यक्ष योगेश गोवेकर, महात्मा गांधी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत सावंत, पोलीस पाटील विनिता मयेकर, सातोसे पोलीस पाटील संदीप सातार्डेकर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. महात्मा गांधी विद्या मंदिर हायस्कूल, महात्मा गांधी प्राथमिक शाळा नं १ व महात्मा गांधी प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्री रवळनाथ मंदिरपर्यंत दिंडी काढली .विद्यार्थ्यांनी विठ्ठल - 

रुक्मिणीची तसेच वारकऱ्यांची वेशभूषा केली होती. दिंडी सोहळा साकारताना महात्मा गांधी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तरचावाडा येथून सुरुवात केली. तिठा व श्री रवळनाथ मंदिर परिसरात गोल रिंगण करून नृत्य सादर केले.विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेषात अप्रतिम टाळ नृत्य सादरीकरण केले.विठ्ठल - माऊलीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणामध्ये न्हाऊन निघाला होता.