
वैभववाडी : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र दत्ताराम रावराणे यांची शिर्डी येथील ‘बी द चेंज फाउंडेशन’ आयोजित राज्यस्तरीय आदर्श संस्थाचालक पुरस्कार – २०२६ साठी निवड करण्यात आली आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी शिर्डी येथे संपन्न होणार आहे. श्री.रावराणे हे गेली ३५ वर्षे शैक्षणिक,राजकिय व सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत.वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.या माध्यमातून इंग्रजी माध्यम शाळा, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चालविल्या जातात. शिक्षण क्षेत्रातील समर्पित कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि समाजाभिमुख शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.या पुरस्कार सोहळ्यात सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, बॅच तसेच पारंपरिक महाराष्ट्रीयन फेटा देऊन गौरव करण्यात येणार आहे.संस्थेचे अध्यक्ष मयूर ठोकचोळे यांनी यांनी हा पुरस्कार जाहीर केला. या पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर श्री. रावराणे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










