
सावंतवाडी : जिल्हाधिकारी यांच्या बैठकीला न बोलवल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गटनेते खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी सभागृहात याबाबत आक्षेप नोंदवून नाराजी व्यक्त केली.
गटनेते श्री. कुडतरकर यांनी शिवसेना नगरसेवकांना का आमंत्रित केला नाही ? असा सवाल केला. यावर नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी मुख्याधिकारी यांना याबाबतच्या सूचना केल्या. तसेच नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी बैठकीस आमंत्रित न केल्याने आम्ही देखील नगरसेवक आहोत. भाजपसह कॉग्रेस, उबाठा शिवसेनेचे नगरसेवक असताना शिवसेना नगरसेवकांना आम्हाला बैठकीचा कुठलाही फोन आलेला नाही. जिल्हाधिकारी बैठकीस असताना आम्हाला का बोलावलं गेलं नाही ? असा सवाल नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केला.










