LIVE UPDATES

कणकवली ते पंढरपूर पायी वारी

युवा वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 13, 2026 12:52 PM
views 483  views

कणकवली : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील वारकऱ्यांचा भक्तिमय उत्साह यंदाही पाहायला मिळत आहे. गेली 20 वर्षांपासून कणकवलीतुन विजय डेगवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक कोल्हापूर येथील नागनाथ भजनी मंडळ (नागदेववाडी) यांच्या समवेत पायी पंढरपूर वारी करत आहेत. यावर्षीही कणकवलीतून सलग दुसऱ्या वर्षी पायी वारीचे आयोजन करण्यात आले असून, या वारीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरत आहे. ज्येष्ठ वारकऱ्यांसोबत मोठ्या संख्येने युवा वर्गही विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. या वारीमध्ये विजय डेगवेकर ,शंकर धुरी ,हर्षल अंधारी अमित सापळे ,शशांक बेळेकर विशाल कसालकर ,अक्षय चव्हाण ,तेजेश काणेकर ,निवृत्ती धडाम ,राजेश चव्हाण ,तुषार तांडेल ,विद्याधर सावंत ,काका कसालकर,कौशिक अंधारी ,राजू हडकर ,ज्ञानेश्वर चौगुले ,प्रसाद देसाई ,शामसुंदर मेस्त्री ,अच्युत वाळके ,संकेत मसुरकर ,मंगेश सदडेकर ,सिद्धेश कुशे यांच्यासह अन्य देखील वारकरी सहभागी झाले आहेत 

टाळ-मृदंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि विठ्ठलभक्तीच्या वातावरणात ही पायी वारी पुढे सरकत असून, कणकवलीतील वारकरी परंपरा अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे. युवकांच्या वाढत्या सहभागामुळे वारकरी संप्रदायाची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास निश्चितच हातभार लागणार असल्याची भावना वारकरी व्यक्त करत आहेत.