
सावंतवाडी : राज्यातील अनेक भागात दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे. पाणी हा शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून शहरातील ५७ कोटींच्या पाईपलाईनचे काम मागील ७ महिने बंद आहे. हे नळपाणी योजनेचे रखडलेले काम तातडीने सुरु करावे, अन्यथा आठ दिवसांत मुख्याधिकारी यांना घेराव घालून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी दिला.
सावंतवाडी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. परब बोलत होते. यावेळी नगरसेवक देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी, अजय गोंदावळे, सेन्हा नाईक, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
गेल्या सात महिन्यांपासून नळपाणी योजनेचे काम बंद असताना प्रशासनाकडून ते सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याबद्दल श्री. परब यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच संबंधित ठेकेदाराची माणसे आणि कामगारांना काम करु दिले जात नसून या सर्व प्रकाराला मुख्याधिकारी जबाबदार असल्याचा आरोप श्री. परब यांनी केला. नेमके कोणत्या कारणामुळे हे काम थांबविण्यात आले आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी संजू परब म्हणाले की, शहरातील नागरिकांना पाण्याची गरज असताना सत्ताधारी गटातील काही लोकांकडून नळपाणी योजनेचे काम थांबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर राजकारण करणे योग्य नाही. शहरातील नागरिकांना मुबलक व नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी या योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. नळपाणी योजनेचे काम सुरु करण्याची आठ दिवसांची मुदत संपल्यानंतर मुख्याधिकारी कार्यालयाला घेराव घालून आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संजू परब यांनी दिला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








