
देवगड :संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेंतर्गत देवगड तालुक्यातील ४१ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. प्राप्त झालेल्या एकूण ५५ प्रस्तावांपैकी १२ प्रस्ताव त्रुटींच्या पूर्ततेसाठी प्रलंबित ठेवण्यात आले असून, दोन प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत.
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी देवगड तहसीलदार यांच्या दालनात समितीचे अध्यक्ष मिलिंद साटम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला तहसीलदार शीतल जाधव, गटविकास अधिकारी नीलेश जगताप, नायब तहसीलदार संतोष खरात, अशासकीय सदस्य सुहास राणे, मनोज जाधव, शुभांगी राणे, प्रकाश राणे, सहायक महसूल अधिकारी सुधीर साळुंखे, तांत्रिक सहाय्यक योगिता गोवेकर आदी उपस्थित होते.
या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेंतर्गत प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये नजमा गफार तांडेल (मालपेवाडी), संजीवनी संदीप कदम (कुवळे), सुप्रिया सदानंद पुजारे (रामेश्वर), सरिता सुधीर मालवणकर (जामसंडे), संगीता कृष्णा परब (कुवळे), साक्षी संतोष मिठबावकर (किंजवडे), पांडुरंग रामचंद्र देवरुखकर (विजयदुर्ग), समीक्षा सचिन गुलेकर (खुडी), प्रफुल्ल जयवंत पेडणेकर (जामसंडे), आर्यन भाऊ घाडी (किंजवडे), संतोष लक्ष्मण सावंत (वरेरी), नीलेश गणपत मुंबरकर (मिठमुंबरी), दीपक अनंत गुरव (खुडी), प्रमोद नारायण गुरव (कुणकवण), विलास मायाजी घाडी (जामसंडे), शांताराम दत्ताराम कदम (वरेरी), सुरेखा जानू सारंग (मोंड), याज्ञी मुकुंद कामतेकर (कोटकामते), संदेश शशिकांत खटावकर (विजयदुर्ग),
संदीप रमेश मेस्त्री (इळये), निहाल परवेझ शेख (देवगड), अर्चना एकनाथ गोसावी (जामसंडे), स्वच्छंद सिताराम मेस्त्री (जामसंडे), भारती अरुण घाडी (मणचे), अरुणा मनोहर गावकर (मिठमुंबरी), प्रकाश दिगंबर तळवडकर (मोर्वे), सुहासिनी आत्माराम तिर्लोटकर (तिर्लोट), सुनीता दौलत प्रभू (हिंदळे), सुषमा सुभाष नरसाळे (गोवळ), मधुकर सूर्याजी इळकर (गोवळ), पुष्पलता प्रकाश काळे (पडेल), दिलीप विष्णू तेली (मोंड), भास्कर केशव झरकर (जुवेश्वर), पार्वती अंकुश आईर (शिरगाव), शोभा दाजी जाधव (शिरगाव), भारती भास्कर अनभवणे (शिरगाव), शुभांगी वामन मोंडकर (चाफेड), वनिता शांताराम कदम (जामसंडे), अंकुश राघो तेली (कुणकेश्वर), प्रभावती शांताराम घाडी (गोवळ) आणि सुगंधा सुभाष डगरे (मिठबांव) या लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
ताजी बातमी
View all

Gold - Silver Price Drop : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण
November 25, 2026

सावंतवाडीत ५७ कोटींची नळपाणी योजना रखडली
November 25, 2026

Malvan News : पत्रकार सुयोग पंडित यांचा २८ नोव्हेंबरला विशेष सत्कार
November 25, 2026

Kudal News : जिल्हा परिषदेत लोकांच्या प्रश्नांवर एकमत नाही
November 25, 2026
संबंधित बातम्या
View all

Gold - Silver Price Drop : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण
November 25, 2026

सावंतवाडीत ५७ कोटींची नळपाणी योजना रखडली
November 25, 2026

Malvan News : पत्रकार सुयोग पंडित यांचा २८ नोव्हेंबरला विशेष सत्कार
November 25, 2026

Kudal News : जिल्हा परिषदेत लोकांच्या प्रश्नांवर एकमत नाही
November 25, 2026




