LIVE UPDATES

माड्याच्यावाडी येथे भक्तीमय वातावरणात साजरा होणार गुरूपौर्णीमा उत्सव

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 27, 2026 20:07 PM
views 11  views

कुडाळ : तालुक्यातील माड्याचीवाडी खालचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात प्रती वर्षाप्रमाणे बुधवारी 29 जुलै रोजी गुरूपौर्णीमा उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवात पहाटे 5 वाजता संकल्प, सकाळी 6 वाजता गुरूमंत्र, सकाळी 8 वाजता स्वामीच्या मठात धार्मीक विधी, सकाळी 9 वाजता श्री सत्यनारायण महापूजा व आरती, दुपारी 11 वाजता श्री श्री 108 मंहंत मठाधीष प. पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज यांची पाद्यपूजा, दुपारी 11. 30 वाजता दहावी बारावी व योग विद्यार्थाचा गुणगौरव सोहळा, दुपारी 12 वाजता सदगुरूचे प्रबोधन मार्गदर्शन, दुपारी 1 वाजता सदगुरू दर्शन सोहळा व अखंड महाप्रसाद, दुपारी 2. 30 वाजता स्वरसाई आरती मंडळ म्हापसा गोवा यांचा घुमट आरतीचा कार्यक्रम, सायंकाळी 4 वाजता गोपाळकृष्ण रवळनाथ आरती मंडळ एकोशी यांचा घाट आरतीचा कार्यक्रम, सायंकाळी 7 वाजता स्वामीची नित्य आरती, सायंकाळी 7. 30 वाजता मोरेश्वर महीला फुगडी मंडळ नेरूर वाघचौडी यांचा पारंपारीक फुगडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी भावीक भक्तगणानी या सोहळ्यास उपस्थित राहुन श्रींचे व सदगुरू माऊलीचे आशिर्वाद घ्यावेत असे आवाहन श्री सदगुरू भक्त सेवा न्यास या संस्थेचे अध्यक्ष श्री एकनाथ गावडे यांच्यावतीने करण्यात येत आहे.