LIVE UPDATES

राऊत पिता-पुत्राला कडक शिक्षा व्हावी

शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते यांची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 12, 2026 17:47 PM
views 795  views

कुडाळ: प्रतिनिधी 

 माजी खासदार विनायक राऊत यांनी आपली सून गिरिजा राऊत यांच्यावर केलेला जादूटोणा आणि अघोरी कृत्य याचा पर्दाफाश झालेला आहे. स्वतःच्या घरातील एका महिलेशी अशी कृत्ये करणे हे माजी लोकप्रतिनिधीला शोभणारे नाही. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी करावी आणि गिरिजा यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शिंदे शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्या दीपलक्ष्मी पडते यांनी केली आहे. 
  माजी खासदार हे विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत यांची  कसून चौकशी व्हावी. कारण, पुन्हा अशी कृत्ये समाजात घडू नये यासाठी शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणी पीडित गिरिजा यांचे पती गीतेश अन्य संशियतांवर गुन्हे दाखल करून याचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी दीपलक्ष्मी पडते यांनी केली आहे. विनायक राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. तर गीतेश राऊत हे मुंबई महापालिकेत ठाकरे गटाचे नगरसेवक आहेत. या दोघांचे वर्तन अशोभनीय असून याबाबत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांची हकालपट्टी करावी. तसेच गीतेश राऊत यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिंदे शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्या दीपलक्ष्मी पडते यांनी केली आहे.  विनायक राऊत हे आपण धार्मिक असल्याचे भासवितात पण पडद्यामागून ते अंधश्रद्धा, अघोरी विद्या यांच्यात अडकलेले आहेत. राऊत पिता-पुत्राचे पितळ उघडे पडले आहे. गणपती सणात आपल्या घरी गणपतीची ११ दिवस पूजा करून भजने करतात. ते स्वतः भजनी बुवा आहेत, मग ते अंधशश्रद्धेच्या आहारी का गेले? आज त्यांच्याच घरातील एका महिलेचा मानसिक छळ करतात हे अशोभनीय असून या प्रकरणी राऊत पिता-पुत्रांना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी दीपलक्ष्मी पडते यांनी केली आहे.