LIVE UPDATES

कळसुलकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली बांधावरची शाळा

विद्यार्थ्यांना भात रोपणीसह शेतीचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 12, 2026 13:33 PM
views 26  views

सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय,सावंतवाडी. प्रशालेच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रम अंतर्गत असलेल्या बांधावरची शिवार शाळा-2026 या उपक्रमात प्रत्यक्ष भातरोपणीचा अनुभव घेतला.

   यावेळी मळगाव येथील सौ व श्री दीपक मेस्त्री यांच्या शिवार शेतीत विद्यार्थ्यांनी भाताचे रोप काढणे व भाताचे रोप लावणे याचे प्रात्यक्षिक अभ्यासले. यावा विद्यार्थ्यांना शेतीविषयक व भात रोपणी विषयक प्रात्यक्षिकसह मार्गदर्शन केले. या उपक्रमामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक एस.व्ही.भुरे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, शिवार प्रमुख सौ व दीपक मेस्त्री,प्रशालेचे शिक्षक श्रीमती एस.यु.बांदेलकर, अनिल ठाकूर पी.बी.बागुल स्थानिक अंगणवाडी सेविका श्रीविद्यार्थ्यांना शेतीविषयक व भात रोपणी विषयक प्रात्यक्षिकसह मार्गदर्शन केले. या उपक्रमामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक एस.व्ही.भुरे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक  प्रदीप सावंत, शिवार प्रमुख सौ व दीपक मेस्त्री,प्रशालेचे शिक्षक श्रीमती एस.यु.बांदेलकर,  अनिल ठाकूर पी.बी.बागुल स्थानिक अंगणवाडी सेविका श्रीमती खडपकर, श्रीमती राणे, तसेच पालक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतले. यावेळी प्रशालेचे शिक्षक अनिल ठाकूर यांनी शेतशिवार उपलब्ध करून दिल्याबद्दल सौ.व दीपक मेस्त्री यांचे प्रशालेच्या वतीने आभार मानले.