LIVE UPDATES

Sindhudurg News : ठाकरे शिवसेनेचे भजन आंदोलन

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर निषेध ; ११२ भजनी मंडळे लाभांपासून वंचित
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 25, 2026 03:02 PM
views 48  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

सिंधुदुर्गनगरी : भजनी मंडळांना साहित्य पुरवणे या योजनेसाठी निधीची तरतूद असूनही जिल्ह्यातील ११२ भजनी मंडळांना लाभांपासून वंचित ठेवण्यात आले. या योजनेचा निधी अखर्चित राहून मागे गेल्या बाबत निषेध व्यक्त करत आज उद्धव ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर भजन आंदोलन केले

जिल्ह्यातील भजन मंडळांना भजनी साहित्य पुरवण्याची योजना गेल्या काही वर्षापासून राबवण्यात येत आहे त्यानुसार जिल्ह्यातील भजन मंडळाकडून गतवर्षी प्रस्ताव मागविण्यात आले होते त्यापैकी मंजुरी दिलेल्या ११२ भजन मंडळांना अद्यापही योजनेचा लाभ दिलेला नाही.

या योजनेसाठी जिल्हा परिषद स्व निधीतून २० लाखाची तरतूद केलेली असताना प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आणि योजनेच्या निकषात जाचक अटी घालून भजनी मंडळांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार उघड झाला आहे. भजनी मंडळांना लाभ न दिल्याने तरतूद केलेली रक्कम अखर्चित राहून ती शासनाला परत करावी लागली ही जिल्हा परिषदेची शोकांतिका आहे. असे उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

जिल्ह्यातील भजनी मंडळांना लाभापासून वंचित ठेवण्याच्या या प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी आज माजी आमदार वैभव नाईक, उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या जन्हवी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर "भजन आंदोलन" करण्यात आले तर येत्या महिन्याभरात वंचित राहिलेला भजन मंडळांना लाभ न दिल्यास सर्व भजन मंडळांना घेऊन जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. या आंदोलनात

उपनेत्या जान्हवी सावंत, जिल्हाप्रमुख वैभव नाईक, राजू राठोड, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, तालुका संघटक बबन बोभाटे, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी,गणेश मेस्त्री, बाळू पालव, नंदू आंबेरकर, ओरोस विभाग प्रमुख रवी कदम बुवा, भगवान परब, रवी परब, मामा ओरोसकर, निलेश परब, अमित राणे,  , सदाशिव पालव, यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

RPD College students rescue a man who fell into Moti Lake in Sawantwadi.
Sawantwadi Moti Lake : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या धाडसाचे कौतुक
November 25, 2026
संविधान दिनानिमित्त सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम
November 25, 2026
Food Express recruitment for delivery tempo drivers at Karaswada, Mapusa, Goa.
कायमस्वरूपी नोकरी पाहिजे ?
November 25, 2026
Rajaram Khorjuvekar stages an indefinite hunger strike outside Kudal Tehsil Office over the Bhajan Dabalbari controversy.
डबलबारीतील अश्लील भाषेच्या वापरावर सर्वच दोषींवर कारवाई करा
November 25, 2026
संबंधित बातम्या

View all

RPD College students rescue a man who fell into Moti Lake in Sawantwadi.
Sawantwadi Moti Lake : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या धाडसाचे कौतुक
November 25, 2026
संविधान दिनानिमित्त सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम
November 25, 2026
Rajaram Khorjuvekar stages an indefinite hunger strike outside Kudal Tehsil Office over the Bhajan Dabalbari controversy.
डबलबारीतील अश्लील भाषेच्या वापरावर सर्वच दोषींवर कारवाई करा
November 25, 2026
Lakhs of devotees gather at Shri Devi Mauli Temple in Sonurli for the annual Mauli Jatra.
Sonurli Mauli Jatra 2026 : सोनुर्लीच्या श्री देवी माऊली जत्रोत्सवाला लाखो भाविकांची मांदियाळी
November 25, 2026