LIVE UPDATES

BJP Sindhudurg : मायकल डिसोजा, सुजाता पडवळ, जितेंद्र गांवकर यांसह १० जणांचे निलंबन मागे

भाजप जिल्हाध्यक्षांची माहिती
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 09, 2026 16:17 PM
views 78  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जि. प. व पं. स. निवडणुकीदरम्यान पक्षातील पदाधिकारी यांनी पक्षशिस्तीच्या विरोधात काम केलेले असल्याने त्यांचे पक्षीय निलंबन केले होते. यातील काही पदाधिकारी यांनी आपली चूक लक्षात येताच पक्षाकडे निलंबन रद्द करण्यासाठी विनंती अर्ज केले होती त्यानुसार निलंबन मागे घेण्यात आल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.

ते म्हणाले, पक्षपातळीवर पक्ष पदाधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा करून शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार पदाधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यात येत असून, त्यांना पुन्हा एकदा पक्षकार्यासाठी संधी देण्यात येत आहे.

निलंबन मागे घेण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली जिल्हा परिषद मतदार संघाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नितीन एकनाथ राउळ, कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य मायकल फ्रान्सिस डिसोजा, तुळस जिल्हा परिषद सदस्य सुजाता अजित पडवळ, माजगाव विभागाचे पंचायत समिती सदस्य जितेंद्र पांडुरंग गावकर, माजी जिल्हा परिषद सभापती शर्वाणी शेखर गावकर, भाजपचे माजी बांदा मंडल अध्यक्ष स्वागत रघुवीर नाटेकर, योगेश अशोक केणी, उल्हास उत्तम परब, स्नेहल संदीप नेमळेकर, साक्षी संदीप नाईक, सुप्रिया शैलेश नाईक, प्रवीण नारायण गवस आणि अनिरुद्ध फाटक यांचा समावेश आहे.