LIVE UPDATES

kankavli news : कणकवली शहरातील अनधिकृत बॅनर हटविण्यास सुरुवात

नगरपंचायतची कारवाई : गणेश भक्तांच्या स्वागतासह अन्य आशयाचे झळकले बॅनर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 09, 2026 17:06 PM
views 81  views

कणकवली : शहरात फुटपाथ, विजेचे खांबांवर अनाधिकृतपणे लावण्यात आलेले जाहिरातीचे बॅनर कणकवली नगरपंचायतीने हटवण्यास सुरुवात केली आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात गणेश भक्तांचे स्वागत अशा आशयाचे बॅनर विद्युत खांबांवर व दर्शनी ठिकाणी झळकत आहेत.

अनधिकृतरित्या लावण्यात आलेले बॅनरवर नगरपंचायत प्रशासन कारवाई करीत आहे. याबाबतचा ठराव कणकवली नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. अनधिकृत बॅनर संदर्भात तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या अनधिकृत बॅनरवर कारवाई होणार असल्याचे सांगितले होते. त्याच पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत बॅनर काढण्यास आता नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे.