
देवगड : देवगड तालुक्यातील वेरेरी येथील दत्तात्रय ऊर्फ सनी प्रकाश कदम (वय २८) यांचे मंगळवारी (३ नोव्हेंबर) रात्री ८.३० वाजता उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. सनी कदम यांचा तळेबाजार पेठ येथे बेकरी पदार्थांचे दुकान आहे. या दुकानाच्या माध्यमातून ते प्रामाणिकपणे व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते.
मनमिळाऊ स्वभाव आणि सर्वांशी आपुलकीने वागण्याच्या वृत्तीमुळे ते मित्रपरिवारात लोकप्रिय होते. विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समजताच तळेबाजार परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या निधनाने मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, काका, काकी असा परिवार आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all







