
चिपळूण : शहरातील पंचायत समिती शेजारील रमाई माता सभागृहात चिपळूण तालुका सरपंच संघटनेची सभा गुरुवारी १० सप्टेंबर रोजी पार पडली. या सभेत संघटनेची नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे. यामध्ये सरपंच संघटनेच्या अध्यक्ष पदी बामणोली गावचे सरपंच सुदेश गोपाळ गमरे यांची निवड तर सचिव पदी आबीटगावचे सरपंच सुहास भागडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे माजी अध्यक्ष योगेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच संघटनेची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला तालुक्यातील सरपंच उपस्थित होते. यावेळी पहिल्या कार्यकारिणीची मुदत संपल्यामुळे या सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
यामध्ये संघटनेच्या अध्यक्ष पदी सुदेश गोपाळ गमरे, उपाध्यक्ष राघो गणपत आंबवकर, स्नेहा विलास वाजे, सचिव सुहास भागडे, सहसचिव नीता निलेश शिंदे, खजिनदार आदिती अविनाश गुडेकर, संघटक चंद्रकांत तांडकर, सदस्य म्हणून गायत्री गणेश जोगळे, नम्रता नितीन मोहिते आणि आत्माराम बाबू बांबाडे यांची निवड करण्यात आली आहे.
ही चिपळूण तालुका सरपंच संघटनेची नूतन कार्यकारिणी आहे. या सभेला माजी अध्यक्ष योगेश शिर्के, माजी सचिव विकास गमरे, माजी सल्लागार सुनील हळदणकर, तन्वी खेडेकर, महेश आदावडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीला सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.











