
देवगड : देवगड-निपाणी या 66 किलोमीटर लांबीच्या राज्य महामार्गाच्या दुपदरीकरण व कॉक्रीटी करणाचे सध्या काम सुरू आहे.या कामासाठी 331 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे.मात्र देवगड - निपाणी या राज्य महामार्गाच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप करत देवगड जामसंडे समन्वय समितीने आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
देवगड येथील खाकशी पर्यन्त च्या आतापर्यंत च्या झालेल्या सर्व रस्त्याच्या कामाची क्वालिटी निकृष्ट झाली असून कंट्रोल विभागामार्फत तपासणी करावी.अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,असा निर्वाणीचा इशारा देवगड जामसंडे शहर विकास समन्वय समिती मुख्य समन्वयक शामल जोशी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.यावेळी शामल जोशी, अश्विनी मोहिते, सुधीर मांजरेकर, प्रशांत खवणेकर, राजेंद्र मिस्त्री, शरद लाड, जगन्नाथ कोयंडे,शिवराम निकम आदी उपस्थित होते.
देवगड जामसंडे समन्वय समिती कडून देवगड -निपाणी महामार्गाची पाहणी करत असताना देवगड - निपाणी या महामार्गाच्या दुपदरीकरण व काँक्रीटी करणाच्या कामाबाबत तसेच कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
देवगड - निपाणी महामार्गाचे नव्याने काँक्रीटीकरण करण्यात आले आहे.मात्र या रस्त्याची अवस्था काही दिवसांतच उघड झाली आहे. नवाकोरा रस्ता असतानाही ठिकठिकाणी खड्डे पडू लागले असून अनेक ठिकाणी भेगा देखील पडल्याचे चित्र समोर आले आहे.कोट्यवधींचा खर्च करून केलेल्या या कामाचा दर्जा ठेकेदाराने खरोखर राखला आहे का ? असा संतप्त सवाल या वेळी देवगड जामसंडे समन्वय समिती कडून आक्रमक होत
देवगड -निपाणी या महामार्गाच्या दुपदरीकरण व काँक्रीटी करणाच्या कामाबाबत विचारण्यात आला आहे.
यावेळी समितीकडून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
यावेळी समन्वय समिती मुख्य समन्वयक शामल जोशी म्हणाल्या , “ देवगड -निपाणी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत. या ठिकाणी अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण?”असा सवाल त्यांनी यावेळीउपस्थित केला आहे.या कामाची तातडीने क्वालिटी कंट्रोल विभागाकडून तपासणी करण्यात यावी,अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
नांदगाव ते देवगड दरम्यान अनेक जोडरस्त्यांची कामे देखील अद्याप पूर्ण झालेली नाहीत.ठेकेदाराने सर्वत्र रस्त्यांची दुर्दशा करून ठेवली आहे,अशा शब्दांत समिती मुख्य समन्वयक शामल जोशी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.कामाच्या दर्जाची तातडीने तपासणी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.अन्यथा त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.यावेळी समन्वय समितीचे सदस्य,अश्विनी मोहिते,सुधीर मांजरेकर, प्रशांत खवणेकर,राजेंद्र मिस्त्री,शरद लाड, जगन्नाथ कोयंडे,शिवराम निकम यांनीही या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
यावेळी संबंधित कॉन्ट्रॅक्टर उपस्थित नसल्यामुळे साई ट्रॅव्हल्स ऑफिस मधील बैठकीस राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ठेकेदारास उपस्थित राहण्यास सांगावे अशी सूचना त्यांनी केली.रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारला नाही आणि संबंधित विभागाने योग्य ती कार्यवाही केली नाही,तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देवगड -जामसंडे समन्वय समिती कडू देण्यात आला आहे.










