LIVE UPDATES

बाळूमामा दर्शनासाठी देवगडहून विशेष एसटी बससेवा

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 07, 2026 16:13 PM
views 22  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड :  सर्वपित्री अमावस्येनिमित्त संत श्री बाळूमामा यांच्या दर्शनासाठी देवगड आगाराच्या वतीने भाविकांसाठी विशेष एसटी बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता देवगड येथून ही विशेष बस आदमापूर येथे जाण्यासाठी रवाना होणार आहे.

देवगड आगाराची ही विशेष बस देवगड, तळेबाजार, शिरगाव, नांदगाव, फोंडा, राधानगरी, मुदाळ तिठा मार्गे आदमापूर येथे पोहोचणार आहे. संत श्री बाळूमामा यांच्या पवित्र दर्शनासाठी सर्वपित्री अमावस्येनिमित्त मोठ्या संख्येने भाविक आदमापूर येथे जात असतात. या भाविकांची प्रवासाची सोय व्हावी आणि त्यांना सुरक्षितपणे दर्शनाचा लाभ घेता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या देवगड आगारामार्फत ही विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भाविक भक्तांनी या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवगड आगाराच्या वतीने करण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्या या उपक्रमामुळे बाळूमामा दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची प्रवासाची सोय होणार असून, सर्वपित्री अमावस्येनिमित्त भाविकांना भक्तीमय प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.