LIVE UPDATES

सुभाष चौगुले यांची प्रशालेला सदिच्छा भेट

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 11, 2026 12:24 PM
views 35  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : तळेबाजार महात्मा गांधी विद्या मंदिर या प्रशालेला उपसंचालक सुभाष चौगुले तसेच लिंगेश्वर हायस्कूल, तुळसुलीचे मुख्याध्यापक भातिवडेकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे खजिनदार संतोष वरेरकर हे देखील उपस्थित होते.या भेटीदरम्यान चौगुले यांनी प्रशालेतील शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, विविध उपक्रम तसेच शाळेतील उपलब्ध शैक्षणिक सुविधांची माहिती जाणून घेतली. 

त्यांनी शिक्षकांशी संवाद साधून शिक्षण क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांबाबत तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत चर्चा केली.यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उपसंचालक सुभाष चौगुले यांनी विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासासोबतच विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा,असे मार्गदर्शन केले.

लिंगेश्वर हायस्कूल,तुळसुलीचे मुख्याध्यापक भातिवडेकर सर यांनीही प्रशालेच्या उपक्रमांचे कौतुक करून शिक्षक व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या भेटीमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. मान्यवरांच्या मार्गदर्शनाबद्दल प्रशालेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.