
कुडाळ : रोहन सामंत फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी दि. १० सप्टेंबर २०२६ कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील 'नाग्या महादू निवासी वस्तीगृहामध्ये' गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटपाचा स्तुत्य उपक्रम पार पडला.
पावसाळ्याच्या दिवसांत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ये-जा करताना होणारी अडचण लक्षात घेऊन या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान वस्तीगृहातील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.
दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत थेट पोहोचून रोहन सामंत फाउंडेशनने जपलेल्या या सामाजिक बांधिलकीबद्दल परिसरासह समाजातील सर्व स्तरांमधून फाउंडेशनचे विशेष कौतुक होत आहे.












