
देवगड : देवगड जामसंडे येथील श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिर,येथे तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या गटात महात्मा गांधी विद्यामंदिर, तळेबाजारच्या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त करून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उल्लेखनीय यश संपादन केले.विद्यार्थ्यांनी सांघिक भावना, उत्कृष्ट चढाई, बचाव आणि खेळातील शिस्त यांचे प्रभावी दर्शन घडविले.
या यशाबद्दल विजयी संघातील खेळाडू, क्रीडा शिक्षक अजित कदम सर यांचे मार्गदर्शन लाभले.या सर्वांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.










