
कणकवली : रिगल कॉलेज, कणकवली येथे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि पाककला कौशल्याला वाव देण्यासाठी मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रकारचे मोदक प्रात्यक्षिक म्हणून सादर केले.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक उकडीचे मोदक तसेच नावीन्यपूर्ण पनीर मोदक, काकडी स्वाद मोदक, ड्रायफ्रूट्स मोदक आणि चॉकलेट मोदक तयार करून सादर केले. पारंपरिकतेसोबतच नावीन्यपूर्ण कल्पनांचा सुंदर मिलाफ या स्पर्धेत पाहायला मिळाला. स्पर्धेचे परीक्षण प्राचार्या प्रा. तृप्ती मोंडकर आणि मुद्राळे सर यांनी केले. चव, आकार, सजावट, स्वच्छता आणि सादरीकरण या निकषांवर विद्यार्थ्यांच्या मोदकांचे परीक्षण करण्यात आले.
स्पर्धेतील प्रथम क्रमांक – हर्ष ठाकरे (SYHM), द्वितीय क्रमांक – काशिश चव्हाण (FYHM) यांनी मिळविला. तृतीय क्रमांक विभागून योगेश चव्हाण (TYHM) आणि पूजा गोठणकर (TYBCA) यांना देण्यात आला.
ही स्पर्धा संस्थेचे अध्यक्ष संजयराव शिर्के, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. तृप्ती मोंडकर तसेच शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.










