LIVE UPDATES

....तोवर बील अदा न करण्याचा निर्णय : नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले

पुर्णवेळ मुख्याधिकारी मिळण्यासाठी पालकमंत्र्यांकडे मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 10, 2026 19:36 PM
views 114  views

सावंतवाडी : आमचे सदस्य सभागृहात येण्यापूर्वीचा पाणी पुरवठा विभागात काही बीलांचा हिशोब भेटला नाही. त्यामुळे जोवर हिशोब मिळत नाही तोवर बील अदा न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हे पैसे नागरिकांचे असल्याचे नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी म्हटले. तसेच पाणी पुरवठा अधिकारी श्रीम. कांबळे यांच लक्ष त्यावर असल्याचे त्यांनी सांगितले. 

नगराध्यक्षा सौ. भोसले पुढे म्हणाल्या, जोपर्यंत हिशोब मिळत नाही तोवर बील अदा होणार नाही. सत्ताधारी आणि विरोधक आम्ही सर्वजण याबाबत एकत्र असून हिशोब मिळाल्यानंतरच बील अदा केल जाणार आहे. त्याची चौकशी देखील केली जाणार आहे‌. तसेच नागरिकांच्या तक्रारीवर आमचा लक्ष असून त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. नळपाणी योजनेचा थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट दोनवेळा केला असून तिसरा रिपोर्टही केला जात आहे. जिल्हाधिकारी यांच्या अहवालानुसार रिपोर्ट आल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. यावेळी नगरसेवकांकडून ठेकेदाराकडे दोन लाखांची मागणी केल्याबाबतच्या चर्चांवर विचारल असता असा कोणताही विषय आपल्याकडे आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नगरसेवकांच्या पत्रांवर उत्तर देण्यासह नागरिकांच्या कामाला महत्व देण्याच्या सुचना मुख्याधिकारी यांना केल्या आहेत. पुर्णवेळ मुख्याधिकारी मिळण्यासाठी मागणी पालकमंत्री यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.