LIVE UPDATES

देवगड महाविद्यालयामध्ये अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२६ निमित्त विशेष व्याख्यान

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 26, 2026 16:15 PM
views 29  views

देवगड : शिक्षण विकास मंडळ,देवगड संचलित श्री. स. ह.केळकर कला,वाणिज्य , विज्ञान महाविद्यालय,देवगड  व मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताह - २०२६ निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

"महात्मा फुले यांचे अभिजात साहित्य"या विषयावर हे व्याख्यान होणार असून, पुणे येथील ज्येष्ठ अभ्यासक श्री. सुशील म्हसदे हे प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबईचे सचिव डॉ. शामकांत देवरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सदर व्याख्यान सोमवार ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहात होणार आहे. महात्मा फुले यांच्या साहित्यातील अभिजातता आणि त्याचे आजच्या काळातील महत्त्व या विषयावर सखोल उहापोह या व्याख्यानात होणार आहे. तरी या व्याख्यानाचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, साहित्यप्रेमी व देवगड परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. विजय कुमार कुनुरे, उपप्राचार्य प्रा. श्रीकांत  सिरसाठे व मराठी भाषा विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.