
दोडामार्ग : दोडामार्ग म्हावळणकरवाडी येथे हैदोस घालणाऱ्या लाल तोंडी माकडांना पकडण्याची मागणी येथील स्थानिकांनी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यानुसार वनविभागाला याची कल्पना देताच वनविभागाच्या जलद गती टीमने (RRT) पिंजऱ्यात माकडांना पकडून ग्रामस्थांचा त्रास दुरु केला.
गेले कित्तेक वर्षे दोडामार्ग म्हाववळणकर वाडी येथे माकड व लाल तोंडी माकडे हैदोस घालत होती. लोकांच्या घरात किचन मध्ये जाऊन भांडी उडविणे, जेवणाची नासधूस करणे, नारळ खाणे या सर्व प्रकारांमुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी येथील नागरिकांनी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्याकडे माकडांना पकडण्याची मागणी केली होती. त्यानुसार चेतन चव्हाण यांनी वनविभागाला कळवून म्हावळणकरवाडी येथे वनविभागाने पिंजरा लावून त्या माकाडांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. यामुळे स्थानिक नागरिकांनी वनविभाग व नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचे आभार मानले.












