
देवगड : शिक्षण विकास मंडळ संचलित श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधूदुर्ग आणि आप्पासाहेब गोगटे शासकीय ओद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने २९ सप्टेबर, २०२६ रोजी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय “रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र” अंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड येथे करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात बँकिंग, माहिती तंत्रज्ञान, लेखा, ITI, विपणन आणि उत्पादन अश्या विविध क्षेत्रांतील सताक्षी ॲग्रो, मनिपाल बँकिंग, फळ प्रक्रिया प्रकल्प (श्री. श्रीधर ओगले), युनीकेअर हेल्थकेअर, अर्श कुलिंग, ग्लोबल टेक्नोसॉफ्ट/ अथर्व हॉटेल आणि आयटीआय देवगड यासारखे उद्योग सहभागी होणार आहेत.
यासाठी आयटीआय , दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तसेच पूर्ण केलेल्या पात्र उमेदवारांना रोजगाराची ही सुवर्णसंधी उपलब्ध होणार असून, या जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि https://forms.gle/GSCVussRPGvE25AU9 या लिंकद्वारे आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे यांच्यातर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी ९४०३३५०४३६ / ९६५७९९८७९० / ९४६५६५६५६ / ७२४९३१८४३४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










