
सावंतवाडी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने युवतींच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व विकासाच्या उद्देशाने शुक्रवार १६ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘सिंधुशक्ती’ युवती संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात सकाळी ९:३० वाजता सुरू होणार आहे. जिल्ह्यातील १६ ते २९ वयोगटातील युवती या संमेलनात सहभागी होणार आहेत.
आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत युवतींना शिक्षण, करिअर, नेतृत्व, सामाजिक जाणीव आणि स्वसंरक्षण अशा विविध क्षेत्रांत सक्षम बनविणे आवश्यक आहे. याच विचारातून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. युवतींमधील आत्मविश्वास, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि सामाजिक बांधिलकी विकसित करण्यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.
संमेलनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांशी संवाद, युवतींसाठी ‘मिशन साहसी’ उपक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून युवतींना प्रेरणा मिळण्याबरोबरच स्वतःमधील क्षमता ओळखून समाजाच्या विकासात योगदान देण्याची दिशा मिळेल. या संमेलनात जिल्ह्यातील अधिकाधिक युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : 9309487179, 8421641975, 9022078503











