
सावंतवाडी : ग्रामपंचायत कारिवडे येथे 'सेवा संकल्प अभियान', जलसंधारण उपक्रम आणि शैक्षणिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. या अंतर्गत गावातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी आणि महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. वनराई बंधारे कामाचा शुभारंभ व जलसंधारण पाहणी,
गावातील भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात आलेल्या वनराई बंधारे बांधण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते करण्यात आला. यासोबतच जलतारा कार्यक्रमांतर्गत झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, पंचायत समिती सभापती सुश्मिता जाधव, जि. प.सदस्य मायकल डिसोजा, गटविकास अधिकारी निलेश जाधव, पंचायत समिती सदस्य, प्राजक्ता केळुसकर,.शरद धाउसकर, मायकल डिसोजा, जितेंद्र गांवकर, प्रणाली टिळवे, उत्कर्षा गांवकर, सरपंच आरती माळकर, उपसरपंच महेश गावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा जाधव, नितिन गावडे, उमेद अभियानाचे प्रभाग समन्वयक श्री. भिडे, भैरववाडी पोलिस पाटील श्रुती गोसावी, पोलीस पाटील कारिवडे, प्रदिप केळुसकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकर मेस्त्री, माजी सरपंच तानाजी साईल, अशोक माळकर, सामाजिक कार्यकर्ते, संजय सावंत, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, संदिप माळकर, सामाजिक कार्यकर्ते, संतोष बिले, सामाजिक कार्यकर्ते विस्तार अधिकारी, प्रशांत राणे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष,अंकुश जंगले,विस्तार अधिकारी,एकनाथ सावंत,विस्तार अधिकारी,वैभव सावंत, संजिवनी चव्हाण, नम्रता परब, कृषी सेवक शुभम सरोळकर आणि ग्रामपंचायत अधिकारी भरत बुंदे यांची यांची उपस्थिती होती.
प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या हक्काच्या घरकुलांची पाहणी करण्यात आली. या वेळी लाभार्थ्यांच्या हक्काच्या नवीन घरात 'आशिर्वादाचा दिवा' लावून त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांच्याशी जिव्हाळाचा संवाद साधण्यात आला. अभियानाचाच एक भाग म्हणून पेडवेवाडी जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ ला भेट देऊन तेथील शैक्षणिक सुविधांची पाहणी करण्यात आली. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी 'पाणी टंचाई' या ज्वलंत विषयावर अत्यंत प्रभावी व प्रबोधनात्मक विशेष पथनाट्य सादर केले.
तसेच विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून पाणी बचतीचा आणि पर्यावरणाचा संदेश दिला. या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक झाले.या मोहिमे अंतर्गत हर्षदा कारिवडेकर सी.आर.पी. शारदा बोभाटे, सी. आर. पी. ग्रामसंघातील सर्व महिला, महिला बचत गटांच्या पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्यासह गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने श्रमदानासाठी उपस्थित होते. संपूर्ण कारिवडे गावाने एकत्र येत हा कार्यक्रम यशस्वी केला.











