LIVE UPDATES

Tiger Cub Spotted in Sindhudurg : आंबोली-चौकुळ मार्गावर पट्टेरी वाघाच्या बछड्याचे दर्शन

रस्ता ओलांडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 17, 2026 04:02 PM
views 106  views
Tiger cub crossing the Amboli-Chowkul road near Sawantwadi in Sindhudurg at night, captured on a local resident's camera.

सावंतवाडी : सह्याद्री पट्टयामध्ये पट्टेरी वाघाचे अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून आंबोली-चौकुळ मार्गावर मंगळवारी रात्री स्थानिक युवकांना वाघाच्या बछड्याचे दर्शन झाले. रस्ता ओलांडतानाचा त्याचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तालुक्यात आंबोली चौकुळ या सह्याद्री पट्टयामध्ये पट्टेरी वाघांचे अस्तित्व आहे. गेल्या काही वर्षात अनेकदा या पट्टेरी वाघाचे दर्शन स्थानिकांना झाले आहे. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये तब्बल आठ पट्टेरी वाघाची नोंद अधिकृतरित्या झाली होती. यामध्ये पाच मादी तर तीन नर असा समावेश आहे.

आंबोली ते मांगेली हा भाग वाघाचा भ्रमंती मार्ग आहे. त्यामुळे अधून मधून या भागात पट्टेरी वाघाचे दर्शन होत असते. चौकुळ आंबोली मार्गावर अशाच प्रकारे मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास काही स्थानिक प्रवास करत असताना त्यांच्या वाहनासमोर अचानक पट्टेरी वाघाचा बछडा समोर आला.

वाहनाच्या प्रकाशात तो रस्त्यावर काहीसा दचकला. मात्र, काही क्षणात त्याने रस्ता ओलांडून जंगलात पळ काढला. या संदर्भात उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांना विचारले असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला. हा बछडा साधारण दीड ते दोन वर्षाचा असावा असे त्यांचे म्हणणे आहे.


ताजी बातमी

View all

मालवणच्या आनंदव्हाळ-भोसलेवाडीत नळपाणी योजनेच्या कामानंतर उघडे चर
November 17, 2026
Bhuvanesh Malkar from Karivade village in Sawantwadi, who worked as a Prep Artist on the Ramayana and Toxic films through DNEG.
Ramayana Movie : 'रामायण’च्या भव्य निर्मितीत सावंतवाडीच्या सुपुत्राची झेप
November 17, 2026
सिंधुदुर्गात '१७ मराठा रुईवा परिवाराचा' ६४ वा रेजिंग डे उत्साहात साजरा
November 17, 2026
Nitesh Rane Meets Deepak Kapoor Over Sindhudurg Flight Connectivity
Sindhudurg Navi Mumbai Flight Service : चिपी–नवी मुंबई विमानसेवा सुरू
November 17, 2026
संबंधित बातम्या

View all

मालवणच्या आनंदव्हाळ-भोसलेवाडीत नळपाणी योजनेच्या कामानंतर उघडे चर
November 17, 2026
Bhuvanesh Malkar from Karivade village in Sawantwadi, who worked as a Prep Artist on the Ramayana and Toxic films through DNEG.
Ramayana Movie : 'रामायण’च्या भव्य निर्मितीत सावंतवाडीच्या सुपुत्राची झेप
November 17, 2026
सिंधुदुर्गात '१७ मराठा रुईवा परिवाराचा' ६४ वा रेजिंग डे उत्साहात साजरा
November 17, 2026
न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर
November 17, 2026