LIVE UPDATES

जिजाऊ संस्थेच्यावतीने ५ लाख वह्यांचे जिल्ह्यात उद्यापासून मोफत वाटप

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 17, 2026 03:29 PM
views 52  views

सिंधुदुर्ग : जिजाऊ संस्थेच्यावतीने ५ लाख वह्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलं जाणार असून उद्यापासून याचा प्रारंभ केला जाणार आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

जेष्ठ समाजसेवक आणि जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या माध्यमातून  कोकणातील पाचही जिल्ह्यात मोफत उपचार देणारी तीन अद्ययावत रुग्णालये, सिबीएसी,शाळा, स्पर्धा परिक्षा वाचनालये, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, संगणक प्रशिक्षण केंद्र, चाळीसहून जास्त रुगणवाहिका, महिलांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण केंद्र हे सर्व उपक्रम मोफत असून सातत्याने गेली पंचवीस वर्षाहून जास्त काळ निलेश सांबरे हजारो गरजून मदतीचा हात देत आहेत.

पदरमोड करून समाजासाठी अविरत अखंडपणे कार्यरत असलेल्या सांबरे साहेबांच्या माध्यमातून कोकणातील सर्व जिल्ह्यातील माध्यमिक शाळांसाठी तब्बल पस्तीस लाख मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम सुरू केलेला असून उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांना पाच लाख वह्या वाटप करण्यात येणार आहे.

यासाठी जिजाऊचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले असून जिजाऊ परिवाराचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर यांच्या मार्गदर्शना खाली सुदर्शन पाटील, वैभव मसणे, ओकांर तिवरेकर, ज्ञानेश्वर निवरेकर आदी कार्यकर्ते यासाठी कार्यरत आहेत.


ताजी बातमी

View all

मालवणच्या आनंदव्हाळ-भोसलेवाडीत नळपाणी योजनेच्या कामानंतर उघडे चर
November 17, 2026
Bhuvanesh Malkar from Karivade village in Sawantwadi, who worked as a Prep Artist on the Ramayana and Toxic films through DNEG.
Ramayana Movie : 'रामायण’च्या भव्य निर्मितीत सावंतवाडीच्या सुपुत्राची झेप
November 17, 2026
सिंधुदुर्गात '१७ मराठा रुईवा परिवाराचा' ६४ वा रेजिंग डे उत्साहात साजरा
November 17, 2026
Nitesh Rane Meets Deepak Kapoor Over Sindhudurg Flight Connectivity
Sindhudurg Navi Mumbai Flight Service : चिपी–नवी मुंबई विमानसेवा सुरू
November 17, 2026
संबंधित बातम्या

View all

मालवणच्या आनंदव्हाळ-भोसलेवाडीत नळपाणी योजनेच्या कामानंतर उघडे चर
November 17, 2026
Bhuvanesh Malkar from Karivade village in Sawantwadi, who worked as a Prep Artist on the Ramayana and Toxic films through DNEG.
Ramayana Movie : 'रामायण’च्या भव्य निर्मितीत सावंतवाडीच्या सुपुत्राची झेप
November 17, 2026
सिंधुदुर्गात '१७ मराठा रुईवा परिवाराचा' ६४ वा रेजिंग डे उत्साहात साजरा
November 17, 2026
न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर
November 17, 2026