
सावंतवाडी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या वतीने ‘सेवा के 25 वर्ष’ या उपक्रमांतर्गत ‘आशीर्वाद का दिया’ हा विशेष कार्यक्रम जिल्हाभरात उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ सेवेला अभिवादन करत सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब, बांदा मंडल अध्यक्ष मधू देसाई, बांदा सरपंच प्रियांका नाईक, प्रविण देसाई, विनेश दळवी, उमेश पेडणेकर, बाळू सावंत, गुरुनाथ पेडणेकर, रुपाली शिरसाठ आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी करण्यात आले. विविध भागांतील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ‘आशीर्वाद का दिया’ या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत सेवा आणि सामाजिक सहभागाची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाला मिळालेल्या गतीचा उल्लेख करत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवा उपक्रमांच्या माध्यमातून हा दिवस साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या या उपक्रमाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.










