
सावंतवाडी : नगरपरिषद हद्दीतील कळसुलकर हायस्कूल ते विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर निवासस्थाना पर्यंत जाणारा नाला बंदिस्त करण्याच्या विकासकामाचा भूमिपूजन आज संपन्न झाले.
माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी यासाठी नगरविकास खात्याकडून ६० लाखांचा निधी मंजूर करून आणला होता. यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व आमदार श्री. केसरकर यांचे नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी आभार मानले आहेत.
हा नाला बंदिस्त केल्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. वाहतुक कोंडीच्या दृष्टीने हा मार्ग नागरिकांना ये-जा करण्यासाठी सोयीस्कर ठरणार आहे. या कामाचा शुभारंभ आज नगरसेवक देव्या सुर्याजी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
याप्रसंगी नगरसेविका शर्वरी धारगळकर, ज्येष्ठ नागरिक श्री.शिरवलकर व नागरिक प्रसाद वागळे यांच्या हस्ते गा-हाणे घालून श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.यावेळी स्थानिक नगरसेवक देव्या सूर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर,सौ.शिरवलकर,सौ.वागळे,श्रेयस मूंज,प्रवीण देऊलकर,सागर मठकर, गणेश कुडव,अक्षय शिरवलकर,यल्लापा दोडमणी,पियुष राठोड,कंत्राटदार निमिष परांजपे स्थानिक नागरिक आदी उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








