
वेंगुर्ले : मठ गावच्या उपसरपंचपदी सिद्धी हेमंत गावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विद्यमान उपसरपंच सोनिया उमेश मठकर यांनी संघटने अंतर्गत करारानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसरपंचपदाच्या निवडीसाठी मंगळवारी मठ ग्रामपंचायतीमध्ये विशेष सभेचे आयोजन केले होते. नवनिर्वाचित उपसरपंच सिद्धी गावडे यांचा पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांनी अभिनंदन केले.
या सभेत मठ ग्रामपंचायतीचे पंचायत विकास अधिकारी केळुसकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सरपंच रुपाली नाईक, ग्रामपंचायत सदस्य कविता घोलेकर, शमिक मठकर, सदस्य सुभाष बोवलेकर, रवींद्र खानोलकर, अजित राऊळ, महेश धुरी, संतोष वायंगणकर, रामचंद्र परब, प्रकाश गावडे, उमेश मठकर, हेमंत गावडे, मिलिंद मठकर, स्वप्नील मठकर आदी यावेळी उपस्थित होते.










