LIVE UPDATES

कास्ट्राईबच्या आरोग्य विभाग संघटना अध्यक्षपदी दीपक कांबळे

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 18, 2026 21:36 PM
views 28  views

कणकवली :  कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या आरोग्य विभाग संघटनेच्या अध्यक्षपदी दीपक कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. कास्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटनेची सभा नुकतीच माध्यमिक शिक्षक पतपेढी ओरोस येथे कास्ट्राईब महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात आरोग्य संघटना कार्यकारिणी निवडण्यात आली. 


महासचिवपदी संतोष बनसोडे, कोषाध्यक्षपदी आर. डी. चेंदवणकर, सुधीर धामणकर यांच्यासह २१ पदाधिकाºयांची निवड करण्यात आली आहे. सभेला महासचिव संतोष बनसोडे, महेंद्र कदम, शंकर कदम, नागरे भाऊ, सखाराम गुरखे, महादेव कोकरे, सोनाली तांबे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 


बैठकीत संदीप कदम, दीपक कांबळे यांनी संघटनेच्या वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. कास्ट्राईब आरोग्य विभागाच्यावतीने संघटनेने वेळोवेळी शासन दरबारी आवाज उठवून आपले पदोन्नती प्रश्न धसास लावणारी संघटना आहे. संघटनेचा दबदबा निर्माण करण्यात संघटनेचे अध्यक्ष महेंद्र कदम हे यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या कायार्काळात २३ पदोपन्नी संघटनेच्यावतीने शासनाकडे पाठपुरवठा करण्यात आल्याचे संदीप कदम यांनी सांगितले. दीपक कांबळे यांनी आपल्या २७ वर्षांच्या कारकीर्दीत विविध आंदोलन, सभा, मोर्चे आशा विविध मार्गांनी कर्मचारी वगार्ची कामे केली. कर्मचाºयांचे प्रश्न व समस्या सोडविले. कर्मचाºयांवरील अन्यायाला वाचा फोडून कर्मचाºयांच्या न्याय व हक्कांसाठी संघटनेने लढा दिलेला आहे, असे कांबळे यांनी सांगितले.