LIVE UPDATES

कोलगावात श्री देवी सातेरीचा 26 नोव्हेंबर रोजी भव्य वार्षिक जत्रोत्सव

पालखी मिरवणूक अन् दशावतार नाट्यप्रयोगाची रंगत
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 17, 2026 05:44 PM
views 12  views

सावंतवाडी : कोलगाव येथील ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव 26 नोव्हेंबर रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जत्रोत्सवानिमित्त मंदिराला फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. 

सकाळी सातेरी देवतांची पूजा झाल्यानंतर श्री सातेरी देवीची आकर्षक स्वरूपात पुष्पपूजा करण्यात येईल. दुपारी मानाचे नैवेद्य अर्पण करण्यात येणार असून, सकाळपासून ओटी भरण्याचा कार्यक्रमही सुरू राहणार आहे. रात्री १२ वाजता मंदिराभोवती ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

त्यानंतर रात्री १ वाजता पार्सेकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या वार्षिक जत्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे कोलगावसह परिसरातील भाविकांमध्ये जत्रोत्सवाबाबत उत्साहाचे वातावरण आहे.


ताजी बातमी

View all

Swimmers participating in the Sindhudurg Ocean Swimathon at Chivla Beach in Malvan, Maharashtra.
Sindhudurg Ocean Swimathon 2026 : मालवणात १९ व २० डिसेंबरला 'सिंधुदुर्ग ओशन स्विमथॉन' स्पर्धेचे आयोजन
November 17, 2026
मालवणच्या आनंदव्हाळ-भोसलेवाडीत नळपाणी योजनेच्या कामानंतर उघडे चर
November 17, 2026
Bhuvanesh Malkar from Karivade village in Sawantwadi, who worked as a Prep Artist on the Ramayana and Toxic films through DNEG.
Ramayana Movie : 'रामायण’च्या भव्य निर्मितीत सावंतवाडीच्या सुपुत्राची झेप
November 17, 2026
सिंधुदुर्गात '१७ मराठा रुईवा परिवाराचा' ६४ वा रेजिंग डे उत्साहात साजरा
November 17, 2026
संबंधित बातम्या

View all

मालवणच्या आनंदव्हाळ-भोसलेवाडीत नळपाणी योजनेच्या कामानंतर उघडे चर
November 17, 2026
Bhuvanesh Malkar from Karivade village in Sawantwadi, who worked as a Prep Artist on the Ramayana and Toxic films through DNEG.
Ramayana Movie : 'रामायण’च्या भव्य निर्मितीत सावंतवाडीच्या सुपुत्राची झेप
November 17, 2026
सिंधुदुर्गात '१७ मराठा रुईवा परिवाराचा' ६४ वा रेजिंग डे उत्साहात साजरा
November 17, 2026
न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर
November 17, 2026