
सावंतवाडी : मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न निकाली लागला असून हे श्रेय माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांचे आहे. आमदार कसा असावा ? याचे उत्तम उदाहरण श्री. केसरकर आहेत. आजच्या या निर्णयामुळे आरोग्याचा प्रश्न मिटणार आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली. दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून तसेच पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी, नगरसेवक अजय गोंदावळे, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाप्रमुख श्री. परब म्हणाले, आमच्यासारखा माणूस असता तर विषय सोडला असता. पण, दीपक केसरकर यांनी विषय कधीच सोडला नाही. सातत्य ठेवून आज त्यांनी विजय मिळवला आहे. मतदारसंघातील जनतेचे आरोग्याचे होणारे हाल आता मिटणार असून त्यांना दिलासा मिळणार आहे. जनतेचे आशीर्वाद दीपक केसरकर यांच्यामागे निश्चितपणे राहतील, यात कोणतीही शंका नाही. तसेच आयुष ओपीडीचा विषय सुद्धा मार्गी लागला आहे. त्यांना वीज, पाणी, कर माफ करण्याचा ठराव घेतला आहे. तसेच शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित हॉटेल होत आहे. दीपक केसरकर यांनी १० वर्ष त्यासाठी प्रयत्न केले. त्याला यश मिळाले असून दीपक केसरकर यांचे यासाठी अभिनंदन करतो अस मत श्री. परब यांनी व्यक्त केले.
दरम्यान, आरोग्याचा प्रश्नावर कायम टीका केली जात होती. मात्र, केसरकर यांनी आज त्याचं उत्तर दिलं आहे. जो प्रश्न होता, तिढा दोन घराण्यांच्या विषयाबाबतचा होता. तो आज कोर्टातून मार्गी लागला आहे. दीपक केसरकर यांच स्वप्न साकार होणार आहे असे मत महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांनी व्यक्त केले. यावेळी फटाके वाजवून तसेच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.










