LIVE UPDATES

वेंगुर्ला शिवसेनेतर्फे तहसीलदार ओंकार ओतारींचा सन्मान

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 10, 2026 19:26 PM
views 180  views
#kokansadlive#news update#konkan update#

वेंगुर्ला:  कोकण विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वेंगुर्ले चे तहसीलदार ओंकार ओतारी यांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

हा पुरस्कार वितरण सोहळा अलिबाग रायगड येथे संपन्न झाला होता. यानिमित्त वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयात ओंकार ओतरी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करुन त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. 

यावेळी तालुकाप्रमुख बाळा दळवी, उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ भाई परब, शहरप्रमुख अजित राऊळ, पं स माजी सभापती सुनिल मोरजकर, सुचिता वजराटकर, पं स सदस्य साक्षी नार्वेकर, नगरसेविका समिधा रेडकर, लीना म्हापणकर, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, मच्छिमार नेते काशिनाथ नार्वेकर, विभागप्रमुख मितेश परब, पदाधिकारी संजय गावडे, मयूर आरोलकर, सत्यवान साटेलकर, उमेश नाईक, श्री नार्वेकर, वजराट ग्रा प सदस्य रसीका मेस्त्री आदी उपस्थित होते.