LIVE UPDATES

आंबोली मंडलातील एकही शिवसैनिकाचा भाजप प्रवेश नाही

नाव अन् पद जाहीर करा ; उगाच पाठ थोपटू नका : दिनेश गावडे
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 31, 2026 05:30 PM
views 70  views

सावंतवाडी : आंबोली मंडलातील एकाही शिवसेना पदाधिकाऱ्याने अथवा कार्यकर्त्याने भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. भाजपने ज्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिला आहे, त्यांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे यापुढे पक्षप्रवेश घेताना संबंधित व्यक्तीचे नाव, पूर्वीच्या पक्षातील पद आणि राजकीय स्थान स्पष्ट करूनच प्रवेशाची घोषणा करावी. उगाचच स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये, अशा शब्दांत शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांनी भाजपला ठणकावले आहे.

भाजप आंबोली मंडल अध्यक्ष विनेश तावडे यांच्या नेतृत्वाखाली आंबोली मंडलातील काही शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, या वृत्तात भाजपमध्ये प्रवेश केलेले शिवसैनिक नेमके कोण? त्यांची नावे काय ? शिवसेनेत त्यांच्याकडे कोणती पदे होती ? याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी हा खुलासा करावा लागत असल्याचे दिनेश गावडे यांनी स्पष्ट केले.

आमच्या शिवसेनेतील एकाही पदाधिकाऱ्याने अथवा निष्ठावंत शिवसैनिकाने भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला, शिवसेनेत फूट पडली, अशा प्रकारचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. प्रवेश म्हणजे नेमके काय आणि पक्षप्रवेश कोणत्या पद्धतीने घ्यायचा असतो, हे लवकरच मित्रपक्षाला समजेल, असा सूचक इशाराही श्री. गावडे यांनी दिला.

केवळ राजकीय वातावरण निर्मितीसाठी शिवसेनेला धक्का बसल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून जनतेचे मनोरंजन करू नये. भाजपने पक्षप्रवेशाची घोषणा करताना संबंधित कार्यकर्त्यांची नावे आणि त्यांची पूर्वीची राजकीय ओळख जाहीर करावी, असे आवाहनही शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांनी केले आहे.


ताजी बातमी

View all

देवगडमध्ये ६ नोव्हेंबरला ‘स्वरऋतू’ची दीपावलीपूर्व संगीत मैफल
October 31, 2026
आंबोली मंडलातील शिवसेनेच्या अनेक युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
October 31, 2026
विलवडे-वाफोलीतील बेकायदेशीर दगडखाणी व क्रशर बंद करा
October 31, 2026
India vs New Zealand 5th T20 Match Team India and New Zealand Cricket Teams
India vs New Zealand 5th T20 Match : रविवारी भारत-न्यूझीलंडमध्ये पाचवा टी-२० सामना
October 31, 2026
संबंधित बातम्या

View all

आंबोली मंडलातील शिवसेनेच्या अनेक युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
October 31, 2026
विलवडे-वाफोलीतील बेकायदेशीर दगडखाणी व क्रशर बंद करा
October 31, 2026
Yuvraj Lakhmaraje Bhonsle and Yuvrajni Shraddharaje Bhonsle at TEDxIBS Pune
जागतिक व्यासपीठावर युवराज - युवराज्ञींनी मांडले विचार
October 31, 2026
Sindhudurg Collector Trupti Dhodmise Chairs Meeting to Review Drought Relief and Water Conservation Measures
Sindhudurg Drought Management : जलस्रोतांचे बळकटीकरण, चारा व्यवस्थापन व रोजगार हमीच्या कामांना गती द्या
October 31, 2026