LIVE UPDATES

न्यू इंग्लिश स्कूल, पोफळीचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश

वैज्ञानिक प्रतिकृतीमध्ये कुमार शौर्य माने याचा चिपळूण तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 28, 2026 06:18 PM
views 64  views
Shaurya Mane Wins First Rank in Chiplun Science Exhibition

चिपळूण : ५४ व्या चिपळूण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, पोफळी या प्रशालेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या विज्ञान प्रदर्शनातील प्राथमिक गटातील वैज्ञानिक प्रतिकृती विभागात प्रशालेचा विद्यार्थी कुमार शौर्य आकाश माने याने सादर केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृतीने संपूर्ण चिपळूण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे त्याची प्रतिकृती जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवडण्यात आली आहे.

या यशस्वी प्रतिकृतीसाठी शौर्य माने याला विज्ञान शिक्षक प्रदीपकुमार यादव सर, विलास मायनाक आणि सौ. काजवे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासू वृत्ती, कल्पकता आणि संशोधनाची आवड जोपासण्याच्या दृष्टीने हे यश अत्यंत प्रेरणादायी आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल कुमार शौर्य माने व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गमरे मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पोफळी पंचक्रोशीतील पालकवर्ग यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.