
सावंतवाडी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामाना लोक सहभागाची जोड मिळत आहे. पावसाचे पाणी वाहून न जाता ते स्थानिक पातळीवर अडवून जिरवणे भुजल पातळी वाढविणे आणि उपलब्ध पाणीसाठा अधिक काळ टिकविणे या उद्देशाने वनराई बंधारे उभारले जात असून भविष्यातील संभाव्य दुष्काळावर मात करण्यासाठी आणि जलसंवर्धनाला गती देण्यासाठी नेमळे ग्रामपंचायतिच्या वतीने पाणी अडवा पाणी जिरवा अभियांनांतर्गत गावातील छोट्या मोठ्या ओहोळ नाल्यावर बंधारे उभारणीचा, जलताऱ्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हापरिषद अध्यक्ष प्रमोद कामत तसेच पंचायत समिती सभापती सुश्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त बंधारे उभारणीचे उद्दिष्ट नेमळे गावाने हाती घेतले आहे. या कामी नेमळे गावचे माजी उपासरपंच सामाजिक कार्यकर्ते विक्रम पांगम यांनी स्वतः चा जेसीबी डंपर देऊन जसंधरणाच्या कामात मोठा हातभार लावला. यामुळे
एकाच दिवशी दहा बंधारे उभारण्यात आले त्याच प्रमाणे नेमळे माध्यमिक उच्च माध्यमिक, तसेच प्राथमिक शाळांतील विद्यार्थी शिक्षक यांनीही या उपक्रमात सहभागी होऊन प्रत्यक्ष कला कृतीतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामुळे आतापर्यंत नेमळे गावात दहा दिवसात बावीस हुन अधिक बंधारे उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले. या कामी नेमळे ग्रामस्थ, शेतकरी महिला बचत गट,शाळकरी विद्यार्थी, शिक्षक,नेमळे ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी वाडीवार जबाबदारीने पाणी अडवा पाणी जिरवा या जलसंधारणाच्या कामात मदत केल्याने नेमळे ग्रामपंचायत सरपंच दीपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ, ग्रामसेवक चौहान यांनी सार्वांचे आभार मानले.











