
सावंतवाडी : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'सेवा अभियान' आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व सामान्य नागरिकांनी प्रलंबित कामाची निवेदने प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या नावाने सादर करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
सेवा अभियान अंतर्गत महाराष्ट्र विधान परिषद सदस्य भाजप कोकण विभागाचे संयोजक तथा भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता प्रमोद जठार व संतोष साखरे निवेदन स्वीकारणार आहेत. सोमवार 24 ऑगस्ट 2026 सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत काझी शहाबुद्दीन हॉल सावंतवाडी येथे हा कार्यक्रम होणार आहे.











