LIVE UPDATES

केंद्रशाळा हेतचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश

तनिष्का बुराण तालुक्यात प्रथम : प.स.सदस्यांनी केलं अभिनंदन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 20, 2026 19:35 PM
views 34  views

वैभववाडी : केंद्रशाळा वि.मं. हेतच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. या यशाबद्दल पंचायत समितीचे सदस्य देवानंद पालांडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. यामध्ये तालुक्यातील हेत येथील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.येथील

इयत्ता सातवीतील तनिष्का भानुदास बुराण हिने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला असून, कु. आर्या उत्तम फोंडके तालुक्यात सहावी क्रमांक व इयत्ता चौथीतील यश देवानंद फोंडके याने गुणवत्तायादीत स्थान मिळविले आहे. या सर्वांचे व शिक्षकांचे श्री पालांडे यांनी अभिनंदन केले.

यावेळी बोलताना पालांडे यांनी विद्यार्थ्यांनी यशात सातत्य कायम राखावे. यापुढेही असेच सुयश संपादन करून तालुक्याचे नाव उज्वल करावं. तसेच भविष्यात अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आतापासूनच मेहनत घ्यावी असं आवाहन पालांडे यांनी केले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भानुदास बुराण, उपाध्यक्षा योगिता पांचाळ, व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष देवानंद फोंडके, उत्तम फोंडके, मुख्याध्यापक संतोष मोरे, उपशिक्षक हनुमंत गिते, उपशिक्षिका रूपाली कांबळे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.