LIVE UPDATES

ओंकार नवरात्रोत्सव मित्रमंडळ भटवाडीच्या दुर्गा मातेचे भव्य मिरवणुकीने आगमन

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 09, 2026 19:53 PM
views 40  views

सावंतवाडी : ओंकार नवरात्रोत्सव मित्रमंडळ, भटवाडीच्या श्री दुर्गा मातेचे उत्साहपूर्ण आणि मांगल्याच्या वातावरणात, वाजत-गाजत आणि भव्य मिरवणुकीने आगमन झाले. मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर आणि ‘दुर्गा माता की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष भरत परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, दिलीप भालेकर, शिवम सावंत, रघुनाथ धारणकर, भार्गव धारणकर, राजा दळवी, प्रसाद परब, दीपक सावंत, प्रदीप भालेकर, रमेश परब, चंदन नाईक, कुणाल शृंगारे, विजय सावंत, गौरव रामाने, स्वप्निल कमते, तानाजी पाटील, जय भालेकर, दत्तगुरु मोर्ये, संतोष खंदारे, सुनील जाधव, अभय खंदारे यांच्यासह मंडळाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवरात्रोत्सवाच्या काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.