LIVE UPDATES

जि. प. सदस्य मायकल डिसोजा यांच्याकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शेतीची प्रत्यक्ष पाहणी

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 03, 2026 12:14 PM
views 29  views

सावंतवाडी : जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोलगाव परिसरातील शेती पिकांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शेतीची पाहणी केली. शेतीचे झालेले नुकसान लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली.

यंदा जिल्ह्यात पाऊस अत्यंत कमी झाल्याने आगामी काळात तीव्र पाणीटंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर पूर्वउपाययोजना म्हणून गावात ठिकठिकाणी बंधारे उभारण्याच्या कामालाही तातडीने सुरुवात करण्यात आली आहे, जेणेकरून विहिरी व कूपनलिकांची भूजल पातळी टिकून राहील. या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान कोलगाव पंचायत समिती सदस्या सौ. प्रणाली टिळवे, ग्रामपंचायत प्रशासक कमलाकर ठाकूर, ग्राम विकास अधिकारी. अरुण जाधव, कृषी सहाय्यक अंकिता आंबेरकर, निरुखे ग्राम महसूल अधिकारी भाग्यशिला शिंदे तसेच कोलगाव ग्राम महसूल अधिकारी मारुती सलाम हे प्रशासकीय अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी. मनोहर ठिकार, अनिल टिळवे,. विद्येश धुरी, चिन्मय जाधव, श्री. सावंत यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा, अशी अपेक्षा शेतकरी बांधवांनी व्यक्त केली.